*कोंकण Express*
*महाराष्ट्र कामगार दिनाच्या निमित्ताने कामगार बांधवांचा सन्मान*
*कणकवली, आज दिनांक ०१ मे २०२४ , माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्र कामगार दिनाच्या निमित्ताने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले,
*नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी विनोद जाधव यांना जमिल कुरैशी यांनी, तसेच हेमंत नाडकर्णी यांनी प्रविण तांबे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले,
*यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी महाराष्ट्र स्थापना दिन, सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना दिन,कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या,
*माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी विनोद जाधव, प्रवीण तांबे जे प्रकर्षाने आज येथे जो सुलभ शौचालय नव्याने सुरू झालेला आहे, त्याची स्वच्छता ठेवलेली आहे, हे त्यांचे कार्य कौतुकास्पद असुन, त्यांनी अशीच संपूर्ण शहराची स्वच्छता ठेवावी, आणि सर्वांचे आरोग्याची जपणूक करावी, असेही पेडणेकर म्हणाले,
*यावेळी अविनाश गावडे, भगवान कासले, बाबुराव घाडिगावकर, सईद नाईक, निलेश निखार्गे, योगेश पवार, मंगेश जाधव, सर्फराज शेख, पांडुरंग साळुंखे, ओंकार चव्हाण, शकिल शेख, नुरमहम्मद शेख, प्रभाकर कदम, प्रसाद पाताडे, लक्ष्मण महाडिक, काझी, आंदुर्लेकर आदी उपस्थित होते,
*उपस्थित सर्वांनी सन्मान मूर्तींना शुभेच्छा दिल्या,