कासार्डेतील महापुरुष देवाचा गुरूवार 2 मे रोजी वार्षिक उत्सव

कासार्डेतील महापुरुष देवाचा गुरूवार 2 मे रोजी वार्षिक उत्सव

*कोंकण Express*

*कासार्डेतील महापुरुष देवाचा गुरूवार 2 मे रोजी वार्षिक उत्सव*

*कासार्डे प्रतिनिधी :संजय भोसले*

कासार्डे भोगले पारकरवाडी येथील श्री महापुरुष देवालयाचा वार्षिक उत्सव आज (गुरुवार) आयोजित केला आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा व इतर कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवारी सकाळी 9 वा. श्री सत्यनारायण महापूजा होईल, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, सायंकाळी 7 ते 9.30 वा. स्थानिक भजने होतील. तर रात्रौ 10 वा. लोकराजा श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा नवनवीन ट्रीकसिनयुक्त धडाकेबाज दणदणीत नाट्यप्रयोग “कालिकंकाली” सादर होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त भोगले बंधू यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!