सावंतवाडी येथे केंद्रिय मंत्री नारायणराव राणेंचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत

सावंतवाडी येथे केंद्रिय मंत्री नारायणराव राणेंचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत

*कोंकण Express*

*सावंतवाडी येथे केंद्रिय मंत्री नारायणराव राणेंचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत…*

* सावंतवाडी ः प्रतिनिधी*

लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भाजप-राष्ट्रवादी- शिवसेना महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना. दिपकभाई केसरकर व सावंतवाडी नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष राजू बेग यांचा नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी बाहेरचावाडा येथे मुस्लीम बांधवांची सभा संपन्न झाली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अर्षद बेग व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कणकवली-देवगड विधानसभा अध्यक्ष डॉ. अभिनंदन मालंडकर, मा. सभापती मकरंद परब, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष हार्दिक शिगले व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!