*कोंकण Express*
*बालगोपाल हनुमान मंदिर ,कांबळे गल्ली कणकवली येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा*
*अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आयोजकांचे मानले मन:पूर्वक आभार*
२३ एप्रिल २०२४ रोजी कांबळे गल्ली कणकवली येते हनुमान जन्मोत्सव निमित्त स्थानिक दीडशे कलाकारांचा जल्लोष २०२४ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला .यावेळी कणकवली तील ज्येष्ठ नाट्य अभिनेते दीपक परब ,सुहास वरुणकर ,संजय मालंडकर , प्रा.हरिभाऊ भिसे,विवेक वाळके,सौ अक्षता कांबळी,राकेश काणेकर,रविकिरण शिरवल कर इ.कलाकारांचा मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला .यावेळी नाट्य क्षेत्रात भीष्माचार्य म्हणून ज्याची ओळख आहे असे दिपकजी परब , सुहास जी वरूणकर ,हरी भाऊ भिसे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी मालवणी भाषेतील आपल्या मार्गदर्शनाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली.मंडळाचे योग्य नियोजन आणि निवेदकांची उत्तम साथ असल्याने हा कार्यक्रम खूपच छान झाला .या कार्यक्रम ला उपस्थित राहण्यासाठी ज्यांनी संधी दिली ते श्री तेजस गवळी,संजय मालंडकर,सौ वैभवी पाटकर तसेच खास घरी येऊन निमंत्रण देणारे मंडळाचे अध्यक्ष बोर्डवेकर यांचे अक्षता कांबळी यांनी मनापासून आभार मानले