रोणापाल भरडवाडी मधील ग्रामस्थांचा रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार

रोणापाल भरडवाडी मधील ग्रामस्थांचा रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार

*कोंकण Express*

*रोणापाल भरडवाडी मधील ग्रामस्थांचा रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार*

*रोणापाल खेरकटवाडी मधून भरडवाडी कडे जाणाऱ्या रस्ताला एका पक्षाच्या पदाधिकारी कडूनच होत आहे विरोध.*

*बांदा प्रतिनिधी*

गाव मौजे रोणापाल भरडवाडी तसेच खेरकटवाडी मधील लोकांना आपल्या मुलभूत गरजा मागणीसाठी अबाल वृद्ध, गरोदर महिला, शाळेतील विद्यार्थी लहान मुले, शेतकरी यांना कायमस्वरूपी निर्विवाद रस्ता नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एका पक्षाचा पदाधिकारीच खेरकटवाडी मधून भरडवाडीकडे जाणारा पूर्वांपार वापरातील रस्त्या न होणेसाठी प्रयत्न करत असून, स्वत:च्या मर्जीनुसार रस्त्यावर अतिक्रमण करणे व पुन्हा ते काढून टाकून रस्ता पूर्ववत करणे असे वारंवार घडत असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी ०७ मे ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकींमध्ये तसेच येणाऱ्या सर्व निवडणूकांच्या मतदानावर रस्ताचा प्रश्न कायमस्वरूपी न मिटल्यास भरडवाडी मधील जवळपास 100 मतदारांनी पुर्णपणे बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे , देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन सुद्धा वाडीवर जायला रस्ता नसेल तर आम्ही का म्हणून मतदान करायचे असा सवालही येथील नागरिकांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!