*कोंकण Express*
*डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बिनशर्त पाठिंबा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज सिंधुदुर्गातील डी. एड्. बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांची कणकवली ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन महायुतीला पाठिंबा दिला.
यावेळी डी. एड्. बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री विजय फाले व समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.