भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी बालसंस्कार महत्वाचे: – रवींद्र पाताडे

भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी बालसंस्कार महत्वाचे: – रवींद्र पाताडे

*कोंकण Express*

*भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी बालसंस्कार महत्वाचे: – रवींद्र पाताडे*

*कासार्डे विद्यालयात मोफत बालसंस्कार शिबिराचे थाटात उद्घाटन*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

मुलं हीच आपली खरी संपत्ती आहे,बालवयात मुलांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य संस्कार मिळणे गरजेचे बनले आहे.लहान मूलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे जसं वळण लावू तशाप्रकारे घडत जातात, कोणतेही चांगले विचार आणि संस्कारांचे प्रतिबिंब आपणास मूलांच्या बोलण्या-वागण्यातून दिसून येतात.म्हणून भावी पीढी संस्कारक्षम होण्यासाठी अशी ‘बालसंस्कार शिबीरे’ आयोजित होणे काळाची गरज बनली आहेत असे प्रतिपादन कासार्डे विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी रवींद्र सीताराम पाताडे यांनी कासार्डे विद्यालयात केले.
कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय ‘मोफत बालसंस्कार शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रवींद्र पाताडे बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी सैनिक तथा संस्था पदाधिकारी रवींद्र गणपत पाताडे,सहदेव मस्के,प्रकाश तिर्लोटकर, मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर, पर्यवेक्षक एस.डी.भोसले आदी मान्यवर उपस्थित होते .
मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीमातेच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून बालसंस्कार शिबीराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक एन.सी कुचेकर यांनी करताना मुलांच्या कलागुणांना वाव देणारे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर टाकणारे हे शिबिर असल्याचे सांगितले.
“मोबाईलपासून दूर राहण्यासाठी बालसंस्कार शिबीरे महत्वाची..”
याप्रसंगी प्रकाश तिर्लोटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार झाल्यामूळे त्यांच्याहातून महान कार्ये झाल्याचा दाखला देत मोबाईलपासून दूर राहण्यासाठी अशी शिबीरे महत्वाची आहेत असे प्रतिपादन केले.
“दशक्रोशीतील ७० पेक्षा अधिक मुलांचा सहभाग..”
कासार्डे हायस्कूलमध्ये आयोजित या शिबीराला दशक्रोशीतील ६ ते १३ वयोगटातील ७० पेक्षा अधिक मुलांनी सहभाग दर्शविला आहे.
“शिबीर म्हणजे…अभ्यास सोडून सर्व काही”.
जीवघेणी स्पर्धेच्या युगात बालपण हरवलेल्या मुलांना आनंददायी अनुभव आणि व्यक्तीमत्वात भर टाकणारे शिक्षण मिळावे म्हणून कासार्डे माध्यमिक विद्यालयाने दशक्रोशीतील मुलांसाठी मोफत बालसंस्कार शिबिराचे आयोजित करून या माध्यमातून विविध मनोरंजक खेळ, विस्मृतीत गेलेले बालपणीचे खेळ,आईस ब्रेकिंग,खेळातून विज्ञान, ज्युडो कराटे,थ्रीडी शो, योगासने, हसत खेळत इंग्रजी, मनोरंजनात्मक प्रयोग, रंगावली, कलावर्ग , विविध गुणदर्शन, वैदिक गणित,स्टेम लर्निंगयासारख्या
अनेक कलागुणाचे तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सलग पाच दिवस अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षण दिले जाणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.व्ही.राऊळ यांनी केले तर आभार मानताना दि२९ एप्रिल पर्यंत शिबीर सुरू राहणार आहे अशी माहिती विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.डी.भोसले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!