दरवर्षीप्रमाणे या वर्षीही वरवडे सेंट उर्सुला स्कूलमध्ये उन्हाळीशिबीर.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही वरवडे सेंट उर्सुला स्कूलमध्ये उन्हाळीशिबीर.

*कोंकण Express*

*दरवर्षीप्रमाणे या वर्षीही वरवडे सेंट उर्सुला स्कूलमध्ये उन्हाळीशिबीर…*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या संकल्पनेतून दिनांक १५ एप्रिल ते २६ एप्रिल रोजी उन्हाळी शिबीर आयोजित करण्यात आले. शालेय मुलांचा सर्वांगीण विकास होणे या उद्दिष्टपूर्तीसाठी, विविध कला, खेळ , नृत्य व योगा याचा समावेश करण्यात आला होता. शिल्पकला, कुंभार काम, मेणबत्ती बनवणे , मिरर वर्क ,फॅब्रिक पेंटिंग योगा व मेडिटेशन तसेच बैठे व मैदानी खेळ अशा वेगवेगळ्या कलात्मक , शारीरिक सुदृढता , मानसिक विकास व मनोरंजनात्मक यासारख्या कौशल्याचे प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली हसत खेळत व उत्साहपूर्ण वातावरणात राबवण्यात आले. अशा कडक उन्हाळ्यातही मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व मनापासून आनंदाने प्रत्येक उपक्रमातमध्ये सहभाग यामुळे त्यांच्या आरोग्य, बुद्धी ,कौशल्य ,कल्पनाशक्ती आणि प्रतिभाशक्ती प्रेरित करण्यासाठी हे उन्हाळी शिबिर खूपच लाभदायक ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!