सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

*कोंकण Express*

*सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत*

*मुंबई, दि. २५ :*

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दिनांक २७ एप्रिल 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे.जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलंवत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही. मतदान केद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी,मतदार जनजागृती,कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!