फोंडाघाट येथील वाघोबा देवाचे विविध कार्यक्रम

फोंडाघाट येथील वाघोबा देवाचे विविध कार्यक्रम

*कोंकण Express*

*फोंडाघाट येथील वाघोबा देवाचे विविध कार्यक्रम*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

फोंडाघाट गांगोवाडी येथील श्री देव वाघोबा मंदिरामध्ये रविवारी (ता. 30) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

श्री देव वाघोबा क्रीडा, सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ फोंडाघाट यांच्यावतीने हा कार्यक्रम होणार असून हे 10 वे वर्ष आहे. श्री देव वाघोबा देवाची महती अनेकांना आहे. त्यामुळे भक्तिभावाने आणि पूर्णपणे श्रध्देने असंख्य भक्त वाघोबा देवाला शरण जातात. दरवर्षी याठिकाणी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम साजरे करून उत्सव साजरा केला जातो.

यावर्षी सकाळी 8 वा. देव वाघोबा पूजन, त्यानंतर श्री गणेश पूजन, 9.30 वा. सत्यनारायण महापूजा होणार आहे. त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद, दु. 1 वा. महाप्रसाद होईल. दुपारी 3 वा. हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी 5 वा. बुवा श्री. नकुल गोसावी यांचे सुश्राव्य भजन होईल, सायंकाळी 6 वा. हरिपाठ व महाआरती, रात्रौ 8 वा. बुवा श्री. भरत मोरे यांचे सुश्राव्य भजन होईल. रात्रौ 9 वा. स्वराधारा भजन मंडळ तांबोळी बुवा अमित तांबोळकर यांचा कार्यक्रम सादर होईल. रात्रौ 12 वा. स्थानिक सुस्वर भजने सादर होतील. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!