*कोकण Express*
*हरकुळ बुद्रूक गावठणवाडी ते जंगमवाडी नागवे रस्त्याला गुरुवर्य डॉ. राजअहमद हुशेनशहा पटेल यांचे नाव…!*
*आम.नितेश राणे यांच्या हस्ते झाले नामफलकाचे अनावरण!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हरकुळ बुद्रूक येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजने करण्यात आली. यावेळी हरकुळ बुद्रूक गावठणवाडी ते जंगमवाडी नागवे रस्त्याला गुरुवर्य डॉ.राजअहमद हुशेनशहा पटेल यांचे नाव देण्यात आले. या नाम फलकाचे अनावरण भाजपा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, उपसभापती सौ.दिव्या पेडणेकर,माजी उपसभापती बाबा वर्देकर,सरपंच गौशिया पटेल,भाजपा कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,माजी उपसभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर,रमेश पावसकर,उपसरपंच चंद्रकांत परब, बाळा गावकर,सचिन तेली,फकीर शहा पटेल, लियाकत पटेल,शरीफ पटेल,आदी उपस्थित होते.
गुरुवर्य डॉ.राजअहमद हुशेनशहा पटेल हे पपू भालचंद्र महाराजांचे भक्त आणि थोर समाजसेवी व्यक्तिमत्व होते.त्यांनी ग्रामीण भागात घरोघरी जाऊन आरोग्य सेवा दिली होती.नेकांचे प्राण वाचविले होते.