कणकवली चोरट्यांचा सुळसुळाट

कणकवली चोरट्यांचा सुळसुळाट

*कोंकण Express*

*कणकवली चोरट्यांचा सुळसुळाट*

*कलमठ- शिक्षक कॉलनी येथे धाडसी झाली चोरी; दुचाकी केली लंपास

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यासह गावात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. सध्या चोर माणसे असताना चोरी करायला लागले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनासमोर एक प्रश्न उभा राहिला आहे.

कणकवली कलमठ येथील शिक्षक कॉलनी मधील रुपेश जाधव यांच्या घरात धाडसी चोरी झाली आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. यामध्ये चोरट्याने घरामध्ये घुसून आत मध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या बेडरूमला बाहेरून कडी घातली व बाहेरील सामान असता व्यस्त करत महत्त्वाचे मिळते काय पाहिले त्यामध्ये त्याने काही साहित्य आणि दुचाकी चोरट्याने घेऊन पलायन केले आहे. त्यामुळे घरात माणसं असताना घुसून धाडसी चोरी या चोरट्याने केल्यामुळे या चोरट्यांना कोणाचेच अभय राहिले नाही असे दिसत आहे.
सोमवारी रात्री देखील कणकवली शहरांमध्ये एका ठिकाणी चोरी झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच ही चोरी झाल्याने कणकवली चवट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!