*कोकण Express*
*श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान, ३ फेब्रुवारी पासून श्री राम रथ सिंधुदुर्ग जिल्ह्यात; भाजपा आमदार नितेश राणे यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी संजना हळदिवे*
अयोध्या येथील श्री राम मंदिर निर्माण कार्य म्हणजे राष्ट्रकार्य आहे.यासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान सुरू झाले आहे.त्यासाठी श्री राम रथ ३ फेब्रुवारी पासून ११ फेब्रुवारी असे नऊ दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाणार आहे.या रथाचे स्वागत जनतेने मोठ्या उत्साहात करावे.राममंदिर निर्माण कार्यात निधी समर्पित करून जनतेने सहभाग घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.राम रथाची सिंधुदुर्ग जिल्हा भ्रमंती ३ फेब्रुवारी रोजी कणकवली तालुक्यातून सुरू होणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्या यांच्या माध्यमातून अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी वर भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्य सुरू झाले आहे . या कार्यात देशातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग असावा यासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान दिनांक १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत देशभर होत आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या अभियानाची सुरुवात १५ जानेवारीपासून झालेली आहे . या अभियानाचा एक भाग म्हणून या अभियानासाठीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजागृती व्हावी आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभाग घ्यावा आणि या राम कार्यात व राष्ट्रकार्यात सामिल व्हावे असे आवाहन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
यासाठी राम रथ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फिरणार आहे . या राम रथाचे स्वागत जिल्हा वासियांनी मोठ्या उत्साहात करावे त्याचबरोबर राम मंदिर निधी समर्पण अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती सिंधुदुर्गाच्या वतीने ही करत आले आहे .
या रथाचा शुभारंभ कणकवली येथे ३ फेब्रुवारी रोजी होईल . त्यानंतर हा रथ वैभववाडी तालुक्यात ४ फेब्रुवारी रोजी जाईल.,५ आणि ६ फेब्रुवारीला देवगड तालुक्यात हा रथ जाणार आहे .७ फेब्रुवारी मालवण , ८ फेब्रुवारी वेंगुर्ले , ९ फेब्रुवारी सावंतवाडी , १० फेब्रुवारी दोडामार्ग आणि ११ फेब्रुवारी रोजी कुडाळ तालुक्यामध्ये राम रथ जनार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी कळविले आहे.तरी या श्री राम रथाचे स्वागत आणि निधी समर्पण अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.