*कोंकण Express*
*नारायण राणेंचे नेतृत्व म्हणजे विकासाची धमक असलेले नेतृत्व*
*दादांना मत म्हणजे विकासाला मत- माजी आमदार गणपत कदम
*आपण दादांमुळेच घडलो ते आपले श्रध्दास्थान त्यांच्या मागे ठामपणे उभे रहा*
*केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे व माजी आमदार गणपत कदम यांची भेट*
*जुन्या आठवणींना दिला उजाळा, गणपत कदम भावुक*
*राजापूर प्रतिनिधी*
राज्यातच नव्हे तर देशात ज्यांची छाप आहे, विकास करण्याची ज्यांची धमक आहे असे नेतृत्व म्हणजे ना. नारायण राणे असे बेधडकपणे सांगताना आपण देखील ना. राणेंमुळेच घडलो ते आपले श्रध्दास्थान आहे असे नमुद करत रत्नागिरी जिल्हयाचे मागासलेपण दूर करण्यासाठी दादांच्या मागे ठामपणे उभे रहा असे आवाहन राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांनी येथे केले.
केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे मंगळवारी राजापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आपले जुने सहकारी माजी आमदार गणपत कदम यांच्या पन्हळे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कदम यांच्याकडून ना. राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दोन गुरूशिष्यांच्या या भेटीने अनेकांचे डोळे पाणावले. या भेटीप्रसंगी ना. राणे व गणपत कदम यांनी आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी बोलताना गणपत कदम यांनी दादांच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या , बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. विकासाची धमक असलेले नेतृत्व म्हणजे दादा राणे आहेत, दादा तुमचा जन्म सिंधुदुर्गात झाला तिथला विकास पाहिल्यावर आंम्हाला हेवा वाटतो. तुमचा जन्म रत्नागिरीत रत्नागिरी जिल्हयात झाला असता तर या जिल्हयाचाही विकास झाला असता. पण असो देर आयी दुरूस्त आयी. आता खासदार म्हणून निवडून आल्यावर तुंम्ही रत्नागिरीचे मागासलेपण नक्कीच दूर कराल याची मला खात्री असल्याचे गणपत कदम यांनी नमुद केले.
मी आज जरी दुसऱ्या पक्षात असलो तरी दादांबद्दलचे प्रेम कधीच कमी होणार नाही, माझी त्यांच्यावर श्रध्दा आहे. आज मी जो काही आहे तो दादांमुळे असल्याचे नमुद करत नगरसेवक झालो पण त्यानंतर जी सगळी पदे मिळाली, आमदारकी मिळाली ती दादांमुळेच मिळाली असे कृतज्ञतापुर्वक कदम यांनी नमुद केले. शिवसेनेत एकदा जाहिर झालेले तिकिट बदलून आणने शक्य नसते, पण ती किमया दादांनी केली आणि मी आमदार झालो या आठवणीलाही कदम यांनी उजाळा दिला.
कोणताही प्रसंग असो भक्कपणे पाठीशी उभे रहाणारे दादाच होते व आहेत, त्यामुळे रत्नागिरीच्या विकासासाठी तुम्ही सगळयांनी दादांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा सिंधुदुर्ग प्रमाणे नाही त्यापेक्षाही अधिक विकास रत्नागिरीचा होईल. कारण ती करण्याची धमक दादांमध्येच आहे असेही कदम यांनी नमुद केले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना गणपत कदम भावुक झाले होते. तर या दोन दिग्गज आणि विकासाची दुरदृष्टी असलेल्या नेत्यांच्या भेटीप्रसंगी अनेकांचे डोळे पाणावले होते.
याप्रसंगी बोलताना ना. राणे यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा दिला. राजकारणापलिकडेही वेगळं नातं असते ते जपलं पाहीजे असेही ना. राणे यांनी यावेळी नमुद केले. आपण व कदम ५८ वर्षे राजकारणात आहोत, या सगळयांनी मला जे प्रेम दिलं ते कधीच विसरता येणार नाही, तुम्ही कधीही हाक मारा मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. तर आपणाला उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छाही ना. राणे यांनी कदम यांना दिल्या. तर उपस्थितांना गणपत कदम हे देखील विकासाची दुरदृष्टी असणारे नेतृत्व आहे त्यांच्या मनातील रत्नागिरी जिल्हयातील विकास नक्कीच आपण करू असे नमुद केले. यावेळी ना. राणे यांनी कदम यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या आस्थेने चौकशी केली.
याप्रसंगी रवींद्र नागरेकर, डॉ. मिलींद कुलकर्णी यांसह पन्हळे गावातील तसेच राजापूरातील अनेकजण उपस्थित होते.

