*कोंकण Express*
*लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा भटके – विमुक्त आघाडी , सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांचा वेंगुर्लेत प्रचार दौरा*
*महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांडा वस्तीला निधी मंजूर केला*
*भाजपा भटके – विमुक्त आघाडी , जिल्हाध्यक्ष नवलराज काळे*
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ भाजपा भटके – विमुक्त आघाडीचे पदाधिकारी कामाला लागले असून रविवार दिनांक २१ रोजी वेंगुर्लेत त्यांनी भाजपा कार्यालयात भेट दिली . यावेळी तालुक्याच्या वतीने आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शांताराम ( बाळा ) गोसावी , जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व जिल्हा उपाध्यक्ष भरत गोरे यांचे स्वागत निलेश सामंत यांनी केले .
यावेळी भटके – विमुक्त आघाडीच्या वतीने वाडी ‐ वस्तीवर तसेच तांड्यावर जाऊन भेट देऊन पुन्हा एकवार मोदी सरकार तसेच मोदींच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी राणे साहेबांना भटक्या – विमुक्त ची जास्तीत जास्त मते देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , अल्पसंख्याक आघाडीचे सायमन आल्मेडा , बुथप्रमुख पुंडलिक हळदणकर , रामा झिमु शिंदे इत्यादी उपस्थित होते .