कणकवली, दि. १२ : कणकवली महाविद्यालयाची सेमिस्टर ५, सेमिस्टर २ व सेमिस्टर ४ या सेमिस्टरची एटीकेटीची परीक्षा २५ सप्टेंबर पासून ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ५० गुणांची व २५ बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच एमसीक्यूस पद्धतीने घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना लवकरच परीक्षेचे वेळापत्रक कणकवली महाविद्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाणार असून या सेमिस्टरची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घरीच थांबून अथवा घराच्या परिसराजवळील जेथे इंटरनेट उपलब्ध असेल अशा ठिकाणी जाऊन परीक्षा द्यावयाची आहे. विद्यार्थ्यानी याची नोंद घ्यावी तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या संदर्भात महाविद्यालयाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. चौगुले यांनी केले आहे.