मंत्री दीपक केसरकरांनी घेतले स्वामी पादुकांचे दर्शन..

मंत्री दीपक केसरकरांनी घेतले स्वामी पादुकांचे दर्शन..

*कोंकण Express*

*मंत्री दीपक केसरकरांनी घेतले स्वामी पादुकांचे दर्शन…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोलगाव-निरुखे येथे आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तेथील युवा कार्यकर्ते अनिकेत आसोलकर यांच्या निवासस्थानी संत चोळाप्पा महाराजांचे चौथे वंशज योगेंद्र पुजारी यांनी ह्या पादुका आणल्या होत्या. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी दौर्‍यावर असलेल्या श्री.केसरकर यांनी स्वामी पादुकांचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांचे आसोलकर कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी अनिल आसोलकर, अमित आसोलकर, अमरेश आसोलकर, चैतन्य सावंत, किसन धोत्रे, अभिषेक लाखे, राघू चितारी आदी उपस्थित होते. यावेळी योगेंद्र पुजारी यांच्याहस्ते श्री. केसरकर यांना स्वामीची मुर्ती व प्रसाद देवून त्यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!