*कोंकण Express*
*भाजपात प्रवेश करून घेतलेला ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव हे कधीच उबाठा गटाचे नव्हते….*
*युवा सेना तालुका कार्यकारणी सदस्य साईराज नानचे यांचा गंभीर आरोप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
डांबरे येथील ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव हे अपक्ष असून त्यांना उबाठा गटाचे सांगून भाजपात प्रवेश करून घेतला आहे .भाजप कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे डांबरे ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव हे उबाठा गटाचे कधीच नव्हते…. डांबरे भाजप कार्यकर्त्यांचा वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा वरिष्ठ नेत्यांन समोर खोट्या बातम्या पसरविले जात असून त्यांची दिशाभूल करत आहेत. असे करून भाजपा कार्यकर्त्यांना काही मिळणार नाही डांबरे गावातील जनता सुज्ञ आहे. येणाऱ्या काळात आघाडी निवडणुकीत भाजपाला आम्ही मोठा धक्का देऊन त्याचे प्रत्युत्तर देणार येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होईल.

