*कोंकण Express*
*शिक्षक वर्गात विद्यार्थी घडवत आसताना ते प्रत्यक्षात देशाचे नागरिकच घडवत असतात.- अशोक नर*
*कासार्डे प्रतिनिधि : संजय भोसले*
गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करतो हे त्याच्यासाठी व आईवडीलांसाठी खुप महत्वाचे आहे.ज्याना ज्याना बक्षिस मिळाले आहे त्याचे घरी कौतुक होणार आहे.जीवनात स्पर्धा आहे स्पर्धेशिवाय पर्याय नाही.शिक्षक वर्गात विद्यार्थी घडवत असाताना ते प्रत्यक्षात देशाचे नागरिकच घडवत असतात. आणि म्हणूनच शिक्षण घेत असताना मुलांनी एखादे ध्येय निश्चित केले पाहिजे. असे प्रतिपादन वैश्य गुरूमठ हळदीपूर अध्यक्ष अशोक नर यानी केले.ते स्व. माधव नांदगावकर याच्या प्रथम स्मृतीदिन, शिक्षणमहर्षी स्व. दामोदर मराठे याचा व्दिशतक स्मृतीदिन व स्व. सावित्री रेवडेकर त्रिशतक स्मृतीदिन पित्यर्थ संपन्न झालेल्या आंतरशालेय शैक्षणिक स्पर्धा महोत्सवच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे विद्यार्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते .यावेळी अशोक नर याच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था अध्यक्ष नागेश मोरये, नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर, सरचिटणीस राजेंद्र मोरये, खजिनदार रविंद्र रेवडेकर, शैक्षणिक स्पर्धा प्रमुख संजीव शिरसाट, केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, केंद्रमुख्याध्यापक अनाजी सावंत, नांदगाव हायस्कूल मुख्याध्यापक सुधीर तांबे,महेंद्र मुरकर,सिध्देश रजपूत,मारूती शेवाळे,याच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आदी मान्यवर उपस्थित राहणार होते. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरवात देशभक्तीपर व सुविचार वाचन करून करण्यात आली. पुढे बोलताना नर म्हणाले, आपल्याला दुस-याकडे बघून आत्मविश्वास मिळाला पाहिजे.यावेळी बक्षिस मिळाले नाही तर पुढच्या वर्षी मला बक्षिस मिळाले पाहिजे या जिद्दीने परिश्रम केल्यास उत्तम यश मिळवू शकतो. शिक्षणात ध्येये गाठण्याचे लक्ष असले पाहिजे.जो पर्यंत लक्ष गाठत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पोहचता येत नाही असे बहुमूल्य मार्गदर्शन करत विविध दाखले दिले. नागेश मोरये यानी हा उपक्रम एकजुटीने नांदगाव विकास मंडळाने राबवून मुलांची गुणवत्ता ओळखत व्यासपीठ उपलब्ध करून दिले यामुळे भविष्यात यातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडतील असे सांगितले. दरम्यान नांदगाव विकास मंडळ,मुंबईच्या वतीने नांदगाव गावातील जि.प.प्राथमिक शाळा व हायस्कूल मधील पहीली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आंतरशालेय शैक्षणिक स्पर्धा महोत्सवात हस्ताक्षर, शुद्धलेखन, स्मरण, पाठांतर, कथाकथन, वक्तृत्व, निबंध लेखन, चित्रकला, सामान्य ज्ञान अशा विविध स्पर्धेत ६०० मुलांनी सहभाग घेतला होता यावेळी यातील १५८ बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभात रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जि.प.शाळा, हायस्कूल मुख्याध्यापक,शिक्षक व नांदगाव विकास मंडळाचे पदाधिकारी, सभासद, हितचिंतक यानी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन रेवडेकर व सूत्रसंचालन संजय सावंत यानी केले.