*कोंकण Express*
*शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉटरचा १२ एप्रिल रोजी ५५ वा वर्धापन दिन झाला साजरा*
*लॉटरी जगातील सन्मानीय, विश्वासार्हत लॉटरी. महाराष्ट्र राज्य लॉटरचा १२ एप्रिल ५५ वा वर्धापन दिन. शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या वतीने शिवतेज लॉटरी सेंटर डिलाईरोड येथे केक कापून साजरा करण्यात आला. या वेळी अध्यक्ष व अंबरनाथ विधानसभा संपर्कप्रमुख मनोज वारंग यांनी राज्यातील तमाम लॉटरी वितरक, विक्रेता व ग्राहकांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी चिटणीस संदीप विचारे, खजिनदार व खंडळा-वाई विधानसभा संपर्कप्रमुख अविनाश सावंत, मुंबई लॉटरी संपर्कप्रमुख संतोष तोडणकर, सदस्य नारायण गोवलकर, विश्वजीत मयेकर,बबन सावंत व इ. लॉटरी विक्रेते उपस्थित होते*