भुईबावडा घाटमार्ग अवजड वाहतुकीस खुला करा – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची मागणी

भुईबावडा घाटमार्ग अवजड वाहतुकीस खुला करा – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची मागणी

*कोंकण Express*

*भुईबावडा घाटमार्ग अवजड वाहतुकीस खुला करा – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची मागणी*

*भुईबावडा घाटमार्ग अवजड वाहतुकीस खुळा न केल्यास, युवासेना प्रशासनाला विचारणार जाब*

*सिंधुदुर्ग*

भुईबावडा घाटातून अवजड वाहने बंद करण्याचे आदेश कलेक्टर ऑफिस मधून देण्यात आले आहेत. हा आत्ताचा सीजन हा आंबा, काजू बागायत दारांसाठी महत्वाचा सिजन आहे. अशा मध्ये हा घाटमार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्या मुळे या बागायतदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अश्यामुळे 6 टायर गाड्यांना तरी मुभा देण्यात यावी, कारण हा एकच घाटमार्ग त्याबाजूने जी खारेपाटण वाहतूक होते त्यांना भुईबावडा हा मार्ग जवळचा आहे. आणि हाच मार्ग बंद केल्यामुळे त्यांना फोंडाघाट मार्गे वाहतूक करावी लागत आहे व त्यामुळे त्यांना 70 किलोमीटर चा भूदंड हा वाहन चालकांना पडतो. त्यामुळे ही वाहतूक भुईभावडा घाट मार्गे च चालू रहावी,आणि 6 चाकी वाहणांना त्यात मुभा द्यावी अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे. लवकरात लकवर ही युवासेनेची मागणी पूर्ण करावी नाहीतर युवासेना प्रशासनाला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. अशी भुमिका युवासेनेच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!