ज्याच्या मालकाला समाजात नाण्याचीही किंमत राहिली नाही त्यांनी ढबू पैसा हा शब्द उच्चारू नये

ज्याच्या मालकाला समाजात नाण्याचीही किंमत राहिली नाही त्यांनी ढबू पैसा हा शब्द उच्चारू नये

*कोंकण Express*

*ज्याच्या मालकाला समाजात नाण्याचीही किंमत राहिली नाही त्यांनी ढबू पैसा हा शब्द उच्चारू नये*

*आमदार नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका*

*ढबू पैसा हे छत्रपती शिवरायांनी सुरू केलेले नाणे त्याचे महत्व राऊतला कळणार नाही*

*पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांनी स्वतःची लायकी ओळखावी आणि मगच बोलावे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ढबु पैसा हा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी सुरु केलेलं नान. त्याच महत्व औरंग्याचा वंशज असलेल्या संजय राऊत ला काळणात नाही. आमच्या बावनकुळे साहेबांवर बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंच्या कामगाराने करू नये. तुझ्या मालकाच्या नाण्याची किंमत समाजात राहिलेली नाही. पहिले स्वतःची आणि मालकाची बाजारातील किंमत समजून घे आणि मग टीका कर असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला.ते प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.
तुमच्या सारखी इटालियन नान्या समोर आम्ही लाळ चाटत नाही. पाय चाटत नाही.चाटून चाटून तुमच्या जिभेला हाड राहिलेलं नाही. ती जीभ कमी वळवळेल तेवढा कमी त्रास तुला आणि तुझ्या मालकाला होईल. पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी आपली लायकी ओळखा असेही राऊत यांना सुनावले.
तुझ्या मालकाची शोले चित्रपट मधील हसराणी सारखी अवस्था आहे. मालका सोबत काही उरलेला नाही. दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी मालकाची अवस्था बघ. सिल्वर ओक ची उबाठा नेमकं काय आहे. याच विश्लेषण आम्ही करायचं का ? हाताला गजरा लाऊन उबठाचा नंगा नाच कसा पहिला जातो ते दाखवयच का? असा सवाल केला.
नरेंद्र मोदी यांचा 2000 ची बंद पडलेली नीट असा उल्लेख राऊत ने केला. ह्याचा मालक आता बंद पडत चालला आहे. मोदी साहेबांमुळे तुझ्या मालकांचे 18 खासदार निवडून आले याचा विचार कर आणि मग बोल. इंडिया आघाडी मुस्लिम लीग च पिल्लू आहे का ? ह्याच उत्तर द्या आणि मग आमच्यावर टीका करा.
उद्धव ठाकरे चा कोणता नातेवाईक अमित शहा यांच्या घराबाहेर असतो याची माहिती प्रकाश जी आंबेडकर याना असेल म्हणून ते घाबरले. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींचे नाव घेतले नाही तर त्यांच्या सभेला कोणी येणार नाही. सभेत गर्दी करण्यासाठी अस बोलावं लागत.
उमेदवारी बद्दल बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,तुमच्या मनात संभ्रम आहे. आमच्यात नाही. आम्ही सगळे जण महायुती म्हणून कामाला लागलेलो आहोत. ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. लोकांच्या मनातला उमेदवार समजा
बॉक्स
ठाकरेंची जेव्हा जेव्हा कणकवलीत सभा झाली आम्हाला मतदान जास्त झाले.
जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंनी माझ्या कणकवलीत येऊन सभा घेतली तेव्हा मला जास्त मतदान झाले आहे.२०१९ मध्ये सभा घेतली तेव्हा २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले.मला जेव्हडे जास्त विरोधक शिव्या घालतील तेव्हढी जास्त मते मिळतात त्यामुळे या तुमचं स्वागत आहे. असे सांगितले.
बॉक्स
आईंचा महिलांसोबत कायमच संवाद असतो
माझ्या आई सौ नीलम राणे कुठलीही निवडणूक असेल तर त्या महिलांसोबत संवाद साधत असतात. जेव्हा राणे साहेब 2004 मध्ये राज्यात प्रचारात व्यस्त होते तेव्हा आईनेच विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले होते.त्यामुळे सामाजिक,राजकीय विषयात त्यांची पीएचडी झालेली आहे.
बॉक्स
आचार संहितेचा भंग वाटत असेल तर तक्रार करा
तुम्हाला माझे वक्तव्य आचार संहितेचा भंग वाटले तर तक्रार करावी. मी अधिकार वाणीने माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो. माझ्या सरपंचांना वाईट वाटले नाही. संपलेल्या व व्हेंटिलेटरवर असलेल्या खासदारांनी बोलू नये. माझी कामाची पद्धत जशी आहे तसे मी ABC असे ग्रुप करून निधी देणार असेही ते म्हणाले. राऊत नी स्वतःच्या सरपंचांना किती निधी दिला.त्यांना विकास करण्यासाठी कसा न्याय दिला तो मांडावा मी माझ्या विचारांच्या सरपंचांना कसा आणि किती निधी दिला ते सांगतो.त्यामुळे विनायक राऊत यांना त्याच्या प्रश्नांची उत्तरे 4 जून ला मिळतील. आमच्या घरात काय चाललंय हे पाहण्यापेक्षा तुमचे मतदार खळा बैठकीला का येत नाहीत. याचा विचार करा. किमान 5 लाख मतांनी पराभवाची तयारी ठेवा विनायक राऊतला पाडण्यासाठी आम्ही तयार आहोत. कोण कोणाला घाबरतो ते लवकरच समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!