*कोंकण Express*
*तळेरे शेवरा देवीचा 15 ला कार्यक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळेरे वाघाचीवाडी येथील शेवरादेवी देवस्थानची अभिषेक, ब्राम्हणपुजा व समरतान कार्यक्रम सोमवारी (15 एप्रिल) आयोजित करण्यात आले आहेत. दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सर्व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
तळेरे वाघाचीवाडी येथील शेवरादेवी देवस्थान अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी असून दरवर्षी तिथे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केले जातात. त्यासाठी मुंबई येथूनही ग्रामस्थ मोठ्या संख्येने येतात. अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात आणि श्रध्देने सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात इथे पार पडतात.
सोमवारी सकाळी 10 ते 12 वा. अभिषेक व ब्रम्हणपुजा व इतर धार्मिक कार्यक्रम, दुपारी 1 ते 3 वा.पर्यंत महाप्रसाद होईल. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन तळे रे वाघाचीवाडी ग्रामस्थ / मुंबई यांनी केले आहे.