*कोंकण Express*
*स्वतः च्याच कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश दाखवून नेत्यांच्या डोळ्यात धूळफेक*
*लोरे नरामवाडी येथील उबाठा सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केलेच्या वृत्तावर चंदू रावराणे यांचे टीकास्त्र*
आज केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत फोंडाघाट येथे झालेल्या भाजप च्या कार्यकर्ता मेळाव्यात स्वतः च्याच ५-६ कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केल्याचे भासवून आपल्याच नेत्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. ज्या गावात नेतृत्व करतात त्या गावातील पाच पन्नास कार्यकर्त्यांचा तरी प्रवेश घेऊन दाखवावा असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोरे शाखाप्रमुख चंदू रावराणे यांनी केले. यापूर्वी सुद्धा मागील निवडणुकांमध्येही अशाच प्रकारचा दिखाऊपणा त्यांनी केला होता. ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्यांनी स्वतःच्या गावात आणि स्वतःच्या समाजात आपल्या पक्षाची ताकद वाढवून दाखवावी. लोरे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो अढळ असेल. लोरे नरामवाडी येथील उबाठा सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केल्याच्या बातमीनंतर त्यांनी ही टीका केली आहे.