स्वतःची निवडणूक समजून मतदारांपर्यंत पोहोचा,विभागातून ९५ टक्के मतदान महायुतीच्या उमेदवाराला करूया

स्वतःची निवडणूक समजून मतदारांपर्यंत पोहोचा,विभागातून ९५ टक्के मतदान महायुतीच्या उमेदवाराला करूया

*कोंकण Express*

*स्वतःची निवडणूक समजून मतदारांपर्यंत पोहोचा,विभागातून ९५ टक्के मतदान महायुतीच्या उमेदवाराला करूया*

*आमदार नितेश राणे यांनी केले कार्यकर्त्यांना आवाहन*

*कलमठ विभागीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उस्पूर्त प्रतिसाद*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सरपंच उपसरपंच सदस्य निवडणूक जशी लढविली तशी स्वतःची निवडणूक समजून निवडणूक लढवा. महायुतीचा उमेदवाराला ९० ते ९५ टक्के मतदान मिळाले पाहिजे. वरवडे गावात तर शभार टक्के मतदान राणे साहेबाना अपेक्षित आहे त्या पद्धतीने
कलमठ
कलमठ विभागीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी आमदार नितेश राणे,माजी सभापती प्रकाश सावंत,तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे, तालुका उपाध्यक्ष महेश गुरव,सोनू सावंत,अशोकभाऊ राणे,नितीन पटेल,सुनील नाडकर्णी भाजप युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,शिवसेनेचे कणकवली शहर अध्यक्ष प्रमोद मसुरकर यांच्यासह विभागातील सरपंच,उप सरपंच,सदस्य आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जन्म असलेला हा कलमठ या विभागात आहे,कुटुंबातील सदस्यांशी आम्ही बोलत आहोत.मी आपल्याशी संवाद साधत असताना काही गोष्टी सांगणार आहे.गेल्या १० वर्षात संगळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली.आम्ही अडचणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गावातील लोकांनी आमच्या विचारांचे सरपंच निवडून दिलेत.लोकसभा निवडणुकीत स्वतः राणे असतील त्यांचे साठी ९० टक्के ९५ टक्के मतदान झाले पाहिजे.प्रत्येक सरपंचाने त्या पेक्षा जास्त मतदान मिळाले पाहिजे.त्यानंतर ४ जून ला बसणार आहे,आकडेवारी घेऊन,पुन्हा माझ्याकडे निधी मागण्यासाठी याल तेव्हा माझा लक्ष असेल.सरपंच निवडणुकीत कोणाकडे चमत्कार आणि नमस्कार होत होते,हे मला माहीत आहे.कलमठ गावचे पर्यटन सुशोभीकरण कामा पासून सर्व कामे पूर्ण केली आहेत.नारायण राणे साहेबांची ही एकच बैठक लागेल,यापुढे ४ जूनला नंतर विजय मिळवून च भेट होईल.खा.विनायक राऊत आल्यास गेल्या 10 वर्षात काय केलं? हे विचारण्याची गरज आहे.आपल्याला केंद्रात ताकद असलेला खासदार आवश्यक आहे. दिल्ली सरकारशी बोलायचे असेल ते आताच लक्षात घेतलं पाहिजे.आपापसातील मतभेद असतील तर या निवडणुकीत चालणार नाही.देश पातळीवर ची ही निवडणूक आहे.खासदार म्हणून नारायण राणे यांना पाठवायचे आहे.केंद्राच्या लाभार्थ्यांशी तुम्ही थेट घरी जावून संवाद साधला पाहिजे.महायुतीचा उमेदवार जिंकून द्यायचा आहे,हे सर्वांनी लक्षात ठेवा.आणि कामाला लागा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केली.
यावेळी कलमठ गावचे खोत सुनिल नाडकर्णी म्हणाले,विरोधकांच्या मोदी हटाव मागणीत दम नाही.नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री पद पुन्हा मिळावे यासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून देवुया असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!