*कोंकण Express*
*नाटळ विभागात पुन्हा इतिहास घडवा,भरघोस मताधिक्य द्या*
*आम.नितेश राणे यांनी नाटळ विभागीय मेळाव्यात केले आवाहन*
*4 जून नंतर ना राऊत खासदार राहणार ना त्यांच्यासोबत असलेली टाळकी दिसणार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नाटळ सांगवे विभाग हा कायमच राणेंच्या पाठीशी राहिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लीड याच विभागात मला मिळाले. ह्या विभागात विकास प्रस्ताव आला की त्याला विरोध करायचे काम खासदार विनायक राऊत नि केले. विनायक राऊत यांच्या आजवरच्या सर्व खळा बैठका आणि नाटळ विभागाचा या मेळाव्यातील गर्दी पाहिली तर राऊत यांच्या खळा बैठका फिक्या पडल्या. 4 जून नंतर ना राऊत खासदार राहणार ना त्यांच्यासोबत असलेली टोळकी दिसणार अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.
नाटळ विभागाला संदेश सावंत आणि संजना सावंत यांच्या रुपात दोन वेळा जिल्हा परिषद अध्यक्षपद राणे साहेबांच्या आशीर्वादाने मिळाले. या विभागला आजवर सर्वाधिक विकासनिधी आम्ही दिला आहे. येथील जनता राणे साहेबांना मानणारी आहे. घराघरात राणेंवर प्रेम करणारी जनता इथली आहे. 2019 मध्ये विनायक राऊत याना आमच्याकडून पार्सल घेतलेल्यानि गैरसमज करून दिला की या विभागात लीड देऊ. पण जनतेने त्यांना धूळ चारली आहे. असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचा नाटळ विभागाचा महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा कनेडी सांगवे बाजारपेठ नजीक केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जि प अध्यक्ष संजना सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, भाजपा अनुसूचित जाती जमाती सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सुरेश सावंत, संजय सावंत. सरेश ढवळ.
दारीस्ते उपसरपंच संजय सावंत, विजय भोगटे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की 4 जून ला जेव्हा मतदानाची यादी बघाल तेव्हा नाटळ विभाग प्रथम क्रमांकावर असेल याची ग्वाही देतो. विरोधकांकडून अपप्रचार केला जाईल. मुंबईतून काही चाकरमानी गैरसमज पसरवायला आणले जातील. तेव्हा आवर्जून आम्हाला चर्चेला बोलवा. चांगले प्रकल्प थांबवले जातील. नरडवे धरणग्रस्तनामध्ये मोबदल्यावरून गैरसमज निर्माण करण्याचे काम विरोधकांनी केले आहे. अडीच वर्षे महाविकास आघाडी चे राज्य सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना नाटळ विभागासाठी किती विकासनिधी आणला याची माहिती द्या.असे आवाहन यावेळी केले.