*कोकण Express*
*४० वर्षावरील खेळाडूंसाठी हौशी क्रिकेट क्लबच्या वतीने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा…..!*
*उद्या होणार अंतिम सामना ; जेष्ठ खेळाडूंचा होणार सन्मान…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोणत्याही खेळाडूला खेळण्यासाठी वयाची मर्यादा नसते.जो पर्यंत शरीर साथ देते व दर्जेदार खेळ करत असतो.तोपर्यंत प्रत्येक खेळाडू हा मैदानात दिसत राहतो.४० वर्षावरील खेळाडूंसाठी हौशी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जेष्ठ खेळाडू बाबा काझी यांनी केले.
कणकवली तालुका हौशी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित ४० वर्षावरील जेष्ठ खेळाडूसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कणकवली कॉलेजच्या मैदानात करण्यात आले आहे.यावेळी ते बोलत होते.या स्पर्धेचे उदघाटन जेष्ठ क्रिकेटपट्टू बाबा काझी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हौशी क्लबचे अध्यक्ष अनिल हळदिवे, तालुका अध्यक्ष राजू पावकसर,जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर,जेष्ठ क्रिकेटपटू दादा कुडतरकर,बापल धुत्रे,अंकुश निमनकर, राजू पारकर,संजय मालंडकर,माजी नगरसेवक उमेश वाळके,विलास कोरगावकर,किशोर राणे,दादा परब,बंडू गांगण,अभय राणे,सोमा गायकवाड,बीपीन साळवी,अनिल मांजरेकर,शेखर राणे,समीर परब ,मोहन तळगावक आदी मान्यवर व खेळाडू,क्रिकेटरसिक उपस्थित होते.
या सामन्यात जिल्ह्यातील १६ संघांनी सहभाग घेतला आहे. तसेच जेष्ठ क्रिकेटपटूचा सत्कार अंतिम सामन्यावेळी करण्यात येणार आहे.पहिला सामना कणकवली टाऊन x सनराईज हळवल यांच्या मध्ये खेळण्यात आला.या स्पर्धेचे समालोचन विलास गोलतकर यांनी केले.रविवारी सायंकाळी ४वा. अंतिम सामना खेळवला जाणार असून क्रीडारसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन हौशी क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.