*कोंकण Express*
*कासार्डे -बौध्दवाडी शाळेच्या अभिषेक देवरुखकरचे विविध स्पर्धा परीक्षेत तिहेरी यश…*
*आयटीएस,एसटीएस,अब्दूल कलाम प्रज्ञाशोध परीक्षांच्या गुणवत्ता यादीत*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
जि.प. प्राथमिक शाळा कासार्डे बौद्धवाडी प्रशालेचा विद्यार्थी कु. अभिषेक देवेंद्र देवरुखकर यांने तीन स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च(एसटीएस) परीक्षा 200 पैकी 136 गुण सिल्वर मेडल तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा परीक्षेत ३०० पैकी 232 गुन्हा सहकारी केंद्रात दुतीय तर आयटीएस परीक्षेत 300 पैकी 248 गुणांसह जिल्ह्यात १० वा येण्याचा मान पटकावला असून, या गुणवंत विद्यार्थ्यांने तब्बल तीन स्पर्धा परीक्षेतील गुणवत्ता यादीत स्थान पटकावून तिहेरी यश संपादन केलेले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांला सिद्धण्णा दोडमणी व गुरुप्रसाद पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.