*कोकण Express*
*केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना माजी आमदार प्रमोद जठार यांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा*
*कणकवली ः प्रतिनिधि*
माजी आमदार तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमुख जठार यांनी ओम गणेश बंगल्यावर जाऊन केंद्रीय उद्योग मध्ये नारायण राणे यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ओम गणेश बंगल्यावर केंद्रीयमंत्री राणे यांनी नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी पुष्पगुच्छ देत केंद्रीयमंत्री नामदार राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश सावंत, बबलू सावंत, शिशिर परुळेकर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.