कळसुली स्वामी समर्थ मठात भक्तीमय वातावरणात प्रकटदिन सोहळया निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

कळसुली स्वामी समर्थ मठात भक्तीमय वातावरणात प्रकटदिन सोहळया निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

*कोंकण Express*

*कळसुली स्वामी समर्थ मठात भक्तीमय वातावरणात प्रकटदिन सोहळया निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न*

*स्वामी समर्थांच्या नामाच्या जयघोषात स्वामी भक्त तल्लीन *

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील कळसुली येथील श्री.स्वामी समर्थ मठात श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या‌ प्रकटदिन सोहळया निमित्त भाविक भक्तांची मांदियाळी पसरली आहे

श्री.स्वामी समर्थांच्या नामाच्या जयघोषात कळसुली येथील स्वामी समर्थ मठात स्वामी भक्त तल्लीन होऊन भक्ती रसात न्हाऊन गेले.

दिंगबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.दत्ता दिगंबरा याओ, स्वामी मला भेट द्या ओ.,गुरु महाराज गुरु,जय जय परब्रम्ह सद्गुरू

.दत्ता दिगंबरा या हो.स्वामी मला भेट द्या ओ.स्वामी स्वामी बोला ओ,ब्रम्हांनदी डोला ओ,

पायी हळूहळू चाला, मुखाने स्वामी समर्थ बोला.मुखाने स्वामी स्वामी बोला,

कपाळी केशरी गंध, स्वामी मला तुझा छंद.तन मन धन आज अर्पूनी चरणी, स्वामी राया शेवट गोड करी.स्वामी नामाच्या अशा नामघोषात कळसुली येथील स्वामी समर्थ मठात स्वामी भक्त तल्लीन होऊन भक्ती रसात न्हाऊन गेले.

श्री.स्वामी समर्थ मठ आणि परीसर स्वामी नामाच्या जयघोषात भक्तांच्या गर्दीने फुलूनगेला.कणकवली-कुडाळ तालुक्यांसह जिल्ह्यातील स्वामी भक्तांनी कळसुली येथील श्री स्वामी मठात भेट दिली आणि स्वामींचे दर्शन घेतले.दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सकाळी गणेश पूजन, स्वामींचे नित्य पूजन,पादुका पूजन, श्री.सत्यनारायण महापूजा,महाआरती, नामस्मरण, करण्यात आले. प्रकटदिन सोहळ्यानिमित्त कणकवली -कुडाळ तालुक्यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो भाविकांनी स्वामींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

प्रेममय प्रतिष्ठान मुंबई आणि श्री.स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
भक्तीमय वातावरणाने श्री .स्वामी समर्थ मठ कळसुली चा परीसर दुमदुमून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!