कनेडी राडा प्रकरणी सतीश सावंत याना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

कनेडी राडा प्रकरणी सतीश सावंत याना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

*कोंकण Express*

*कनेडी राडा प्रकरणी सतीश सावंत याना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर*

*ऍड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद*

*कणकवली ः प्रतिनिधी*

२०२३ मध्ये कनेडी बाजारपेठ येथे भारतीय जनता पार्टीच्या नाटळ सांगवें विभागिय कार्यालयाच्याठिकाणी माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना राजकीय पुर्ववैमनश्यातून माजी जि.प. अध्यक्ष सतीश सावंत वगैरे ३० ते ४० लोकांनी मारहाण केली होती. याप्रकरणी सतीश सावंत यांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. एल. गायकवाड यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर केला. श्री. सावंत यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पहिले.

२४ जानेवारी २०२३ रोजी हा प्रकार घडला होता. संदेश सावंत, विजय भोगटे आदी कनेडी येथील कार्यालयात बसलेले असताना सतीश सावंत वगैरे ३० ते ४० जणांच्या जमानाबर कार्यालयात प्रवेश केला. यावेळी संदेश सावंत यांच्याकडील अॅपल कंपनीचा मोबाईल हिसकाऊन चोरून नेला. तसेच श्री. सावंत यांनी जमावाला कार्यालय जाळून टाका अशी चिथावणी देऊन सह आरोपींनी लोखंडी सळी, दांडे याने फिर्यादीना मारून जखमा केल्या. तसेच साक्षीदार किशोर परब, विजय भोगटे यांनाही मारहाण केली. याबाबत कणकवली पोलीस स्टेशनला १९ जणांविरूद्ध भादंवि कलम ३०७, ३९२, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी श्री. सावंत यांच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपयांचा अटकपूर्व जामिन मंजूर करताना साक्षीपुराव्यात हस्तक्षप न करण्याची अट घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!