*कोंकण Express*
*कासार्डे तिट्ठा ते तळेरे शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत.
हिंदू नववर्ष स्वागत समितीचा स्तुत्य उपक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या दिवशी कणकवली तालुक्यातील कासार्डे, तळेरे,ओझरम, दारूम पंचक्रोशी मिळून संयुक्त नववर्ष स्वागत यात्रा मंगळवारी सायंकाळी मोठया उत्साहात काढण्यात आली. या शोभायात्रेचे दुसरे वर्ष असून कासार्डे तिठा येथून नववर्ष स्वागत शोभायात्रा निघून तळेरे एसटी स्टॅन्ड पर्यंत जाऊन तेथ विविध कार्यक्रम होत नववर्ष जल्लोष कार्यक्रम होत तिथून पुन्हा कासार्डे तिठयावर ही शोभायात्रा निघून समारोप झाला.
या शोभायात्रेत सर्वात पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळ्याचा चित्ररथासह भगवा धर्म ध्वज नेतृत्व करीत सोबतीला,लहान मुले,पुरुष व महिलांनी पारंपरिक पोषाख परिधान कासार्डे तिठ्ठा येथून भव्यदिव्य शोभायात्रा निघत परिसर हिंदू नववर्षाचा जयघोषाने दणाणून सोडला. दरम्यान पुरुषांनी पारंपारिक वेशभूषा व महिलांनी नऊवारी साड्या पोषाख परिधान करून सहभागी होत ही शोभायात्रेत कासार्डे, तळेरे,ओझरम, दारूम व पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, समाजिक कार्यकर्ते,लहान मुलांसह वयोवृध्द पर्यंत ग्रामस्थ उस्फुर्तपणे सहभागी झाले होते. शेवटी शोभायात्रेसाठी यशस्वी होण्यासाठी ज्यानी ज्यानी सहकार्य केले व सहभागी सर्वांचे आभार मानत समारोप करण्यात आला.