*कोंकण Express*
*सिंधुदुर्ग रत्नागिरी हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला – संजय आंग्रे*
*शिवसेना नेते किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळावी; महायुतीचा उमेदवार विजयी होण्यासाठी काम करणार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर गेली अनेक वर्षे निवडणूक जिंकली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जी विकासकामे झाली आहेत, ती लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत. महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी शिवसेना काम करेल, किरण सामंत यांनाच उमेदवारी जाहीर व्हावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केली.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना महिला
आघाडीप्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुखशेखर राणे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शहराध्यक्ष प्रमोद मसुरकर, भास्कर
राणे, सुनील पारकर, नाना सापळे, बाबू आचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.