बॅ .नाथ .पै .बीएड कॉलेज कुडाळ अंतर्गत डीएसएम पदविका अभ्यासक्रम २०२३-२४ विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

बॅ .नाथ .पै .बीएड कॉलेज कुडाळ अंतर्गत डीएसएम पदविका अभ्यासक्रम २०२३-२४ विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

*कोंकण Express*

*बॅ .नाथ .पै .बीएड कॉलेज कुडाळ अंतर्गत डीएसएम पदविका अभ्यासक्रम २०२३-२४ विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

शैक्षणिक व्यवस्थापन व नियोजन हा पदविका अभ्यासक्रम मुख्याध्यापक पदासाठी अनिवार्य कोर्स आहे . शिक्षणशास्त्रातील महत्वाचा अभ्यासक्रम म्हणून या कोर्सकडे मौलिक दृष्टया पाहिले जाते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत हा अभ्यासक्रम बॅ नाथ पै बीएड कॉलेज कुडाळ पदविका अभ्यासक्रम सन २००७ पासून चालवित आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून नावलौकिक असलेले महाविद्यालय आहे . प्राचार्य धावडे सर केंद्रसंयोजक प्रा नितीन बांबर्डेकर सर प्रा मर्गज सर प्रा . नागेश कदम सर हे शैक्षणिक व्यवस्थापन या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक प्राध्यापक निटनेटके नियोजन करून निष्टापूर्वक अध्यापन करीत असतात सौजन्य आणि विन्रमता या महाविद्यालयाच्या अध्यापकांकडे असल्यामुळे लौकीक दृष्ट्या या महाविद्यालयाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे या वर्षी ६० प्रशिक्षणार्थीनी प्रवेश घेतला होता . या महा विद्यालयाची शिस्त . अध्यापनांचे उच्चदर्जाचे कौशल्ये . विद्यार्थ्यांना निष्ठापूर्वक केलेले ज्ञानदान यामुळे या पदवीका अभ्यासक्रमाची अभिरूची सर्व प्रशिक्षणार्थीची विकसित झाली . सन २०२३ -२४ वर्षाची बॅच नाविण्यपूर्ण होती याच वर्षी स्नेह संमेलन ‘ स्नेह भोजन ‘ वार्षिक कृतिसंशोन सेमिनार . प्रशिक्षणार्थीची ओळख उपक्रम . व निरोप संमारंभ उत्साहात पार पडला . या बॅचचे वर्गनेतृत्व कनेडी हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री बयाजी बुराण सरांनी आत्मीतेने करून सर्वांशी मैत्रीचा ऋणनुबंध राखला. . सर्वच पदविका अभ्यासक्रमांचे प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक ‘ शिक्षक होते . आपले कर्तव्य बजावून प्रामाणिकपणे शिक्षणक्रम पार पाडले . यावेळी केंद्र संयोजक प्रा बांबर्डेकर सरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या प्राचार्य धावडे सरांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या . प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यायाचा निरोप घेतला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!