*कोंकण Express*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे कट्टा(मालवण) येथे आयोजन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव ,बोधिसत्व प.पू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सकाळी ठिक ११ वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा, तालुका – मालवण येथे आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा इ. ५वी ते ८ वी आणि ९ वी ते १२वी या दोन गटात होणार आहे, स्पर्धेचे गट निहाय विषय पुढीलप्रमाणे राहतील- पाचवी ते आठवी .विषय – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाती निर्मूलनाचा लढा-वेळ ५ ते ६ मिनिटे . इ. ९वी ते १२वी विषय – भारतीय राज्यघटनेच्या आदर्शाना जपण्यात तरूणांचे योगदान ,वेळ ६ ते ८मिनिटे.
स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक १००० , द्वितीय क्रमांक ७०० , व तृतीय क्रमांक ५०० तसेच सन्मान चिन्ह व पुस्तक भेट संविधानाची प्रास्ताविका, वही पेन इ. स्वरूपात पारितोषिक देण्यात येईल तसेच स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील, तरी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे दिनांक ९ एप्रिल 2024 पर्यंत स्पर्धा संयोजक आर.डी.चेंदवणकर- 9970507608 ,सुनील जाधव -9421921898,
,रविकांत कदम-9422487992 , नचिकेत पवार – 9420305045. यांचे कडे द्यावित असे आवाहन
,आनंद कासार्डेकर जिल्हाध्यक्ष ,संजय पेंडूरकर जिल्हा सरचिटणीस ,शिवप्रसाद चौकेकर कोषाध्यक्ष ,सुषमा हरकुळकर जिल्हाध्यक्ष महिला ,अपूर्वा पवार सरचिटणीस महिला ,दिपाली चांदोस्कर जिल्हा कोषाध्यक्ष.इत्यादीनी केले आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकानी सहभाग दर्शवावा.

