*कोंकण Express*
*हिम्मत असेल तर उबाठा ने काँग्रेसशी फ्रेंडली फाईट करावी*
*आमदार नितेश राणेंनी उबाठा च्या जखमेवर चोळले मीठ*
*स्व. बाळासाहेबांचा स्वाभिमानी बाणा उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावा*
*फ्रेंडली फाईट च्या काँग्रेसच्या प्रस्तावाने ठाकरेंची हातभर फाटली
*कणकवली ः प्रतिनिधी*
सांगली आणि भिवंडी त एकमत होत नसेल तर फ्रेंडली फाईट करण्याचा प्रस्ताव काँग्रेस ने उबाठा ला दिला आहे, त्यावरून संजय राऊत आणि त्यांचा मालक उद्धव ठाकरे यांची हातभर फाटली आहे. जर स्व. बाळासाहेबांचे रक्त आणि बाणा उद्धव ठाकरेंत असेल तर हिम्मत दाखवून ही काँग्रेस सोबत फ्रेंडली फाईट करावी असे आव्हानच भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेला दिले. ते कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
ज्या सांगलीत तोंड काळे करत राऊत फिरत आहे तेथे काँग्रेस चे वसंतदादा पाटील सारखे जेष्ठ नेते होऊन गेले. उद्धव ठाकरेंची हवा असल्याचे राऊत भासवत आहे. हिम्मत तर दाखवा, फ्रेंडली फाईट करून सिद्ध करा की तुमच्या अंगात बाळासाहेबांचा बाणा आहे. राज्यात 40 प्लस चा दावा करणाऱ्या राऊत ने सांगलीत जर काँग्रेस ने आमची कोंडी केली तर राज्यात काँग्रेसची कोंडी करू असा इशारा दिला आहे.या राऊत यांच्या इशाऱ्यावरून हिम्मत असेल तर फ्रेंडली फाईट करावी.मग राज्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल. असा मार्मिक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
संजय राऊत ज्या वॉर्ड मध्ये राहतो तिथे उबाठा चा नगरसेवक नाही.आणि हा लोकांचे प्रचार करतोय.चड्डीत राहा आणि आपली लायकी ओळखा असाच इशारा दिला. सांगलीतून हेलिकॉप्टर कायमस्वरूपी उडाल की मुंबई पुरत उडाल हे पाहावे लागेल. ते अज्ञात स्थळी जात का ? हे थोड्या वेळात समजेल.असेही ते म्हणाले.फ्रेंडली फाईट हा शब्द ऐकून उद्धव ठाकरेंनी वाईंनचा एक पेग वाढविला आहे.उद्धव ठाकरे फ्रेंडली फाईट करु शकत नाही. आणि केली तर उबाठा च्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त होईल.संजय राऊत मातोश्रीचा नाच्या आहे. हे नाना पटोले यांना देखील समजले आहे. यापेक्षा आणखी कोणाचे सर्टफिकेट हवे.
काँग्रेस चे राहुल गांधी सोनिया गांधी यांच्यावर उद्धव ठाकरेंनी घाणेरडे आरोप केलेले. शिव्या घातलेल्या ते तुम्हाला चालत असतील तर आमच्यावर टीका कण्याचा अधिकार नाही. पवार साहेबांना शिव्या घालून त्यांच्या सोबत तुम्ही आहातच ना मग आम्हाला कोणत्या तोंडाने बोलता.