*कोंकण Express*
*रत्नागिरीत स्वयंवर मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन*
*रत्नागिरी प्रतिनिधी*
आज रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माननीय नारायणराव राणे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित
भाजपा रत्नागिरी शहर, भाजपा रत्नागिरी दक्षिण व भाजपा रत्नागिरी उत्तर मधील प्रमुख पदाधिकारी, बूथ वारियर्स, बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख यांच्याशी संवाद साधला.
या मतदारसंघातून निवडून येण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षाची असून भाजपाचाच उमेदवार निवडून येणार.
यावेळी माजी खासदार माननीय निलेशजी राणे, लोकसभा सहप्रभारी माननीय बाळ माने, रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष श्री.राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, बाबासाहेब परूळेकर, अशोक मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.