*कोंकण Express*
*शाश्वत विकास म्हणजे काय हेच मुळात कळलय ❓हाच मोठा प्रश्न आहे*
*सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा सवाल,
*कोकण ही भूमीच प्रभु परशुरामाने निर्माण केलेली, तिची रचना भौगोलिक परिस्थिती याचा गांभिर्याने कुणीही कधीही अभ्यास केला नाही, हेच आम्हा कोकणवासीयांच सर्वात मोठ दुर्दैव आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही,
*निवडणूका आल्या की एकमेकांच्या नावाने बोंबाबोंब मारणे, हेच जणू समीकरणच झाल्याने, नक्की काय अपेक्षा आहेत कोकणातील जनतेच्या याकडे डोळेझाक करण्यापलीकडे दुसरा धंदाच नसावा कदाचित असे सामान्य जनतेला वाटू लागले आहे,
*कोकणातील निसर्ग आणि त्याला अनुसरून विकास, असे होताना दिसत नाही, हे तमाम कोकणातील जनतेच्या मनात पक्के होताना दिसत आहे, याच कारणामुळे या वेळी पुर्वी प्रमाणे नाक्या नाक्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा दिसून येत नाही,
*आणि हे समजण्यासाठी सामान्य जनतेच्या मध्ये न कळत फिराव लागत, पण अस होताना दिसत नाही,
*प्रत्येक ठिकाणी श्रेय वादाच्या लफड्यात च सर्वांगीण विकास अडकून पडलाय, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही,
*निदान यापुढे तरी कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केली.