भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ४५ वा स्थापना दिवस साजरा

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ४५ वा स्थापना दिवस साजरा

*कोंकण Express*

*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ४५ वा स्थापना दिवस साजरा*

जनसंघापासुन सुरु झालेला प्रवास आता जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष होण्यापर्यंत येवून पोचला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल वेगाने सुरु आहे . नरेंद्र मोदी यांनी ” सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास ” या तत्वावर राज्यकारभार करत गोरगरीबांच्या कल्याणाचे अनेक कार्यक्रम प्रत्यक्षात आणले . स्थापना दिनाच्या निमित्ताने जनसंघाच्या कार्यासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्मरण करणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर यांनी केले .
वेंगुर्ले भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय , भारतमाता व डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच कार्यालयाच्या बाहेर तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकविण्यात आला .
यावेळी श्री साई प्रसाद नाईक (जिल्हा निमंत्रित सदस्य), श्री प्रसन्ना लक्ष्मण देसाई (जिल्हा उपाध्यक्ष), सौ वृंदा गवंडळकर ( जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा), श्री राजन गिरप (जिल्हा नियोजन सदस्य), श्री विनायक गवंडळकर (तालुकाध्यक्ष ), श्री बाबली वायंगणकर (तालुका सरचिटणीस), श्री जयंत मोंडकर ( तालुका चिटणीस), सौ. सुजाता पडवळ (तालुकाध्यक्ष महिला मोर्चा), सौ. हसिनाबेन मकानदार (अल्पसंख्यांक मोर्चा), सौ. श्रेया मयेकर (शहराध्यक्ष महिला मोर्चा), सौ रसिका सुनील मठकर ( सरचिटणीस महिला मोर्चा ), श्री प्रशांत आपटे ( शक्तिकेंद्र प्रमुख), श्री शरद चव्हाण ( ओबीसी सेल अध्यक्ष ) , श्री रवि शिरसाट ( बूथ प्रमुख), श्री पुंडलिक हळदणकर( बूथ प्रमुख), श्री छोटू कुबल (कार्यालय प्रमुख वेंगुर्ला) , प्रणव वायंगणकर , शरद मेस्त्री उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!