*कोंकण Express*
*फळबागायतदार संघाशी शुक्रवारी चर्चा करणार, मंत्री दीपक केसरकर*
फळ बागायतदार संघाचे पदाधिकारी यांना त्यांच्या समस्याबाबत चर्चा करण्यासाठी आज बुधवार दिनांक ३ एप्रिल रोजी एक वाजता बांदा येथे भेटीसाठी वेळ दिली होती ही वस्तुस्थिती आहे. मात्र माझी पूर्वीची मिटींग उशिरा संपल्यामुळे मला बांदयात पोहोचायला दुपारी दोन वाजले. मात्र त्यापूर्वीच काही पदाधिकारी निघून गेल्याचे सांगण्यात आले. मी, फोनवर चर्चा करून त्यांना थांबण्याच विनंती केली होती. मात्र ते पदाधिकारी थांबले नाही. कोणत्याही शेतकऱ्याला मी. ताटकळत ठेवलेले नाही. त्यामुळे मी फळ बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी भेटी साठी वेळ दिलेली आहे. तेव्हा त्यांच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी कृपया गैरसमज करून घेऊ नये. असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले