भुईबावडा घाटातील निर्जीव दगडांना जिवंतपणा आणण्याचा अनोखा प्रयत्न

भुईबावडा घाटातील निर्जीव दगडांना जिवंतपणा आणण्याचा अनोखा प्रयत्न

*कोकण Express*

*भुईबावडा घाटातील निर्जीव दगडांना जिवंतपणा आणण्याचा अनोखा प्रयत्न’*

*सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपक्रम; कार्यकारी अभियंता, अजयकुमार सर्वगोड यांच्या संकल्पनेतून दगडांवर पशु, पक्षी, प्राणी यांचे चित्र रेखाटण्याचे काम*

*कणकवली ः प्रतिनिधी*

वैभववाडी तालुक्यातील भुईबाववडा घाटातील निर्जीव दगडांना जिवंतपणा आणण्यासाठी सा बां विभागाकडून अनोखा प्रयत्न केला जात आहे. कार्यकारी अभियंता, अजयकुमार सर्वगोड यांच्या संकल्पनेतून दगडांवर पशु, पक्षी, प्राणी यांचे चित्र रेखाटण्याचे काम कुडाळ येथील ओरिगो या संस्थेमधील कलाकारांमार्फत सदरचे काम केलं जात आहे.

सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या घाटमार्गामधील भुईबावडा घाट रस्ता हा एक महत्वाचा रस्ता आहे. मागील सुमारे दोन महिन्यापासून वैभववाडी व गगनबावडा यांना जोडणारा करुळ घाट रस्ता बंद पडल्यापासून या भुईबावडा घाटमार्गे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खारेपाटण, भुईबावडा मार्ग तसेच भुईबावडा-गगनबावडा घाट हा मागील अनेक वर्षापासून अरुंद व अत्यंत दुरावस्था झालेला मार्ग होता. सन 2022-23 व 2023-24 या वर्षामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांचे कडून सदर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेऊन पुढे करण्यात आले असून आता खारेपाटण ते भुईबावडा या रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरणासह पूर्ण झाली आहे. भुईबावडा घाटातही रुंदी करणाचे काम झाले असून डांबरीकरणाचे काम आता प्रगती पथावर आहे. लवकरच हा पूर्ण रस्ता रुंद व चांगल्या पृष्ठभागाचा झालेला दिसून येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!