*कोंकण Express*
*स्वाभिमानी गुरव मित्रमंडळ कलमठ गुरववाडी आयोजित श्री सत्यनारायण महापूजा*
*७ एप्रिल रोजी आयोजन; जय जय गौरीशंकर हे महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग*
*कणकवली/प्रतिनिधी*
स्वाभिमानी गुरव मित्रमंडळ कलमठ गुरववाडी आयोजित श्री सत्यनारायण महापूजा कलमठ गुरववाडी येथे रविवारी दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी दत्ताराम गुरव यांचे घरी आयोजित केलेली आहे.
या कार्यक्रमप्रसंगी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२ ते ३ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ वाजता महाजनीनगर महिलांचे भजन, सायंकाळी ६ ते ८ वाजता दत्तगुरु प्रासादिक हरिपाठ कीर्तन मंडळ दिगवळे यांचा सृश्राव्य हरिपाठ, रात्री ८ वाजता दशावतारी नटसम्राट कै. शंकर मोर्ये प्रस्तुत मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ यांचे जय जय गौरीशंकर हे महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
तरी आपण सहकुटुंब सहपरिवार आणि मित्रमंडळींसह अगत्य उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष श्री. ज्ञानदेव गुरव, उपाध्यक्ष श्री. दत्ताराम गुरव यांनी केले आहे.