*कोंकण Express*
*सौ आशाताई भोसलेंची भारतीय बौद्ध महासभा महिला तालुका अध्यक्ष पदी निवड तर भक्तीताई जाधव सरचिटनिस*
*भारतिय बौद्धमहासभा कणकवली तालुका शाखेच्या महिला विभागाची कार्यकारणी जाहीर*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्गची मासिक सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हाभवन कणकवली येथे नुकतीच संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष आद. सुषमाताई हरकुळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेमध्ये कणकवली तालुक्याची नवनिर्वाचित महिला विभागाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये
अध्यक्ष: आशाताई भोसले(दारूम),सरचिटणीस : भक्तीताई जाधव (कणकवली ), कोषाध्यक्ष: रवीनाताई कांबळे ( आशिये), उपाध्यक्ष संस्कार विभाग रजनीताई कासर्डेकर (कासार्डे),उपाध्यक्ष प्रचार पर्यटन विभाग : संयोजिताताई जाधव (तळवडे), हिशोब तपासणीस,: सुनिताताई कांबळे (कासार्डे), कार्यालयीन सचिव : क्रांतीताई पवार (जानवली), सचिव संस्कार विभाग: 1) स्वराताई कांबळे (सांगवे), 2) सुमेधाताई जाधव (फोंडा), सचिव पर्यटन प्रचार: अश्विनीताई कांबळे (सांगवे), आदींची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सुषमाताई हरकुलकर ,जिल्हा सरचिटणीस अपूर्वा ताई पवार, कोषाध्यक्ष दिपालीताई चांदोसकर ,जिल्हा हिशोब तपासणीस साक्षी ताई खानोलकर, संस्कार सचिव ऋतुजा ताई चेंदवनकर, उपाध्यक्ष प्रचार पर्यटन संचिताताई जाधव ,कार्यालयीन सचिव रोहिणी ताई जाधव, संरक्षण सचिव ज्योतीताई कांबळे, संघटक वैशालीताई वराडकर ,तसेच भारतिय बौद्धमहासभा जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हासंस्कार सचिव सुनील जाधव ,जिल्हासंघटक राकेश वराडकर ,केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर ,जिल्हा कार्यकारणी सदस्य उत्तम जाधव ,तालुका सरचिटणीस आद. जनिकुमार कांबळे, तालुका महिला उपाध्यक्ष आद. रवीना ताई कांबळे, तालुका कार्यालयीन सचिव प्रकाश कांबळे ,माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, आणि कणकवली, सिद्धार्थ नगर ,कासार्डे, ओझरम ,दारूम आशिये, फोंडा, सांगवे, जानवली, तळवडे ,सावडाव या गावशाखेमधील बहुसंख्य महिला सदस्य उपस्थित होत्या. नूतन कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष सुषमाताई हरकुळकर व सर्व जिल्हा महिला कार्यकारीणी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.