पक्षी वाचवा पर्यावरणाचे रक्षण करा

पक्षी वाचवा पर्यावरणाचे रक्षण करा

*कोंकण Express*

*पक्षी वाचवा पर्यावरणाचे रक्षण करा*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय हरितसेना व पर्यावरण विभाग यांचा उपक्रम*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

नगरपंचायत कणकवली ,विद्यामंदीर माध्यमिक प्रशाळा , राष्ट्रीय हरितसेना आणि पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला असून, जागतिक तापमान वाढीच्या दुष्परीणामा बाबत जनजागृतीही केली जात आहे. निसर्गातील पक्षी आज दुर्मिळ होत आहेत . वाढते प्रदूषण ‘ रासायनिक खतांचा अतिवापर ‘ औषध फवारणी यांचा दुष्परिणाम निसर्गातील पक्ष्यांच्या प्रजातीवर होत आहे आता उष्णतेचा वाढता प्रभाव निसर्गातील पाण्याचा साठाही संपत आला आहे . पक्ष्यांना पाणी आणि धान्य नैसर्गिकरित्या सहज उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे . आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जागतिकीकरण ‘ आधुनिक घरे ‘ सिमेंटची घरे ‘ वाढती लोकसंख्या ‘ यामुळे जीवनशैली बदलत चालली आहे . वृक्षतोड मोठ्याप्रमाणात होत आहे जंगले नष्ट झाली आहेत त्यामुळे नैसार्गिक पर्यावरण संपुष्ठात आले आहे . याचा सर्व परिणाम पक्षी जीवनावर होत आहे . परिसरातील कावळा ‘ चिमणी हे पक्षी दुर्मिळ झाले आहेत . त्यांची घरटी नष्ट झाली आहेत घरट्यांना जागाच शिल्लक नाही . पक्ष्यांचा चिवचिवाट आता ऐकायलाच येत नाही निसर्गात पशुपक्षी विकसित होण्यासाठी त्यांना नैसर्गिक आधिवास निर्माणे गरजेचे आहे . त्यासाठी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण विभाग यांच्या मार्फत श्री प्रसाद राणेसर यांना टाकावू वस्तू ‘ प्लॅस्टिक बाटल्या ‘ इ वस्तूंचा वापर करून सर्व विद्यार्थ्याना स्वतः प्रात्यक्षिकांद्वारे कृतिकरून दाखवून मार्गदर्शन केले शाळेच्या परिसरात अनेक वृक्ष आहेत तिथे पक्ष्यांना पाणी आणि धान्य यांची सोय करण्याचे देखिक मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून घेतले तसेच आपल्या घराच्या परिसरात जिथे मोकळी जागा असेल तिथे – तिथे पशू पक्ष्यांच्या नैसर्गिक आहारांची व पाण्याची सोय करावी असे आवाहन केले .
आपली संस्कृती विविध सण समारंभ साजरी करणारी आहे रंगपंचमी हा महत्वाचा सण भारतभर उत्साहाने साजरा होत असतो पण आज या सणाला वेगळेच वळण लागले आहे अनेक प्रकारचे रासायनिक रंग वापरून रंगपंचमी खेळली जाते त्याचा माणसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे म्हणून नैसर्गिक रंग कसे तयार करावे यांचे ही प्रात्यक्षिक श्री राणेसर व शिरसाट मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दाखवून येणारी रंगपंचमी शाळेत सुद्धा साजरी करावी पण स्वतः तयार केलेले निसर्ग निर्मित रंगांचा वापर करून रंग पंचमीचा आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक श्री पी .जे . कांबळे सरांनी निसर्ग व पर्यावरण यांचे मार्गदर्शन केले . या उपक्रमाला प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते तसेच पर्यवेक्षक सौ तांबे मॅडम श्री नागभिडकर सर . नगर पंचायतीचे उचले मॅडम ‘ कांबळे मॅडम उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!