पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेचा फित कापून शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते

पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेचा फित कापून शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते

*कोकण Express*

*पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेचा फित कापून शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते…!*

*सिंधुदुर्गनगरी : ता. २९ :*

पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजने प्रायोजित केलेल्या जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ सिंधुदुर्गनगरी आयोजित पत्रकारांच्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ शुक्रवारी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या पत्रकार संघानी या क्रिकेट स्पर्धेत सहभागी सहभाग घेत मालवण, देवगड, वैभववाडी, कणकवली, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला व कुडाळ या आठही तालुक्यांच्या पत्रकार संघासह यजमान असलेला सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघही क्रिकेट सामने खेळळा! या क्रिकेट स्पर्धांचे प्रायोजक पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज ने स्विकारले होते.

शुभारंभप्रसंगी आमदार नितेश राणे म्हणाले, जिल्हातील पत्रकारांनी एक आदर्श पायंडा सुरू केला आहे. एरवी पत्रकारितेच्या कामात व्यस्त असणार्‍या आपण सर्वांनी अशी स्पर्धा घेऊन पत्रकारांचा एकोपा जोपासला आहे. पुढच्या काळात पत्रकारांनी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीं आणि पत्रकारांचा एक क्रिकेट संघ असे क्रिकेट स्पर्धा बोलवावी. यात एका बाजूला लोकप्रतिनिधी व दुसर्‍या बाजूला पत्रकार असे सामना होईल. यात लोकप्रतिनिधींनी आपापसातील कोडिनेशन असते हे दाखवून देतील आणि सांघिक भावना ठेवून एकोप्याने पत्रकारांशी लढत देतील असा विश्वासही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला .

पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजने प्रायोजित केलेल्या या पत्रकारांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष वायंगणकर, जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण, उद्योजक व कार्यकर्ते संतोष वालावलकर, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरोसकर, पत्रकार संघाचे विभागीय सचिव नंदू महाजन, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, महेश सरनाईक, भगवान लोके, विजय पालकर, देवयानी ओरोसकर आणि जिल्हाभरातून आलेले पत्रकार तथा पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!