माझा कार्यकर्ता हा माझा अभिमान..! लोकसभा निवडणुकीत तो सार्थकी ठरवा

माझा कार्यकर्ता हा माझा अभिमान..! लोकसभा निवडणुकीत तो सार्थकी ठरवा

*कोंकण Express*

*माझा कार्यकर्ता हा माझा अभिमान..! लोकसभा निवडणुकीत तो सार्थकी ठरवा*

*रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा महायुतीचा उमेदवार दोन लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणा”

*भाजप नेते,केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले कार्यकर्त्यांना आवाहन*

*देशाच्या प्रगतीसाठी भाजप महायुतीचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याचा संकल्प करूया*

*मोदी जी ही देशाची गरज आहे, त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा*

*संघटनात्मक आढावा बैठकीत मंत्री नारायण राणे यांनी साधला संवाद*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

निवडणूक हे युद्ध आहे.मन, बुध्दी शांत ठेवून जनतेत जा, प्रत्येकाला मोदी सरकारचे विधायक काम सांगा . मोदी जी ही देशाची गरज आहे.ते कर्तुत्वाने देश विकसित करत आहेत. देशाला जगात सर्वोत्तम करण्यासाठी अबकी बार चारशे पार खासदार निवडू देण्याचा संकल्प करा. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा महायुतीचा उमेदवार दोन लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणा. माझा कार्यकर्ता हा माझ्यासाठी श्रेष्ठ आहे.तुम्ही माझा अभिमान आहात. तो विश्वास आणि अभिमान सार्थकी लावा.असे आवाहन भाजप नेते ,केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक आढावा बैठक सभेच्या रूपाने संपन्न झाली.कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साहात पाहावयास मिळाला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,कोकण संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,लोकसभा निवडणुक प्रमुख प्रमोद जठार सह प्रमुख बाळ माने, सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली,माजी आमदार अजित गोगटे,महीला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर ,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री,बँक अध्यक्ष मनीष दळवी, रंजीत देसाई,अशोक सावंत,राजू राऊळ,संदीप साटम,मनोज रावराणे, जाधव,संध्या तेरसे,किनवडेकर,प्रकाश मोर्यें,अविनाश पराडकर,यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख,सुपर ओरियर्स ,बुथ कमिटी अध्यक्ष,सरपंच उपसरपंच,आदी सह असंख्य पदाधिकारी उपस्थित आहेत.
केदिय मंत्री नारायण राणे यांनी विरोधकांचा समाचार घेताना म्हणाले,नारायण राणे आजारी पडला आणि आराम करतो असा एक दिवस दाखवा.१५/१६तास काम करतो.माझ्या आजारपणाची काजी करू नका.मी तंदुरुस्त आहे.अजुन उमेदवारी जाहीर झाली नाही तर मला घाबरले.आणि म्हणून मी आजारी आहे अशा अफवा पसरवत आहेत. हिम्मत असेल तर मर्दासारखे निवडणुकीला सामोरे जा.अस आव्हान यावेळी त्यांनी दिले.
काय काम तुम्ही केलात ते जनतेला सांगा. लोकसभेत काय काम केले त्याचा हिशेब द्या.
मी चीपी विमानतळ आणले तेव्हा १५ लोक घेवून याच उबाठा खासदार ने विरोध केला.काम पूर्ण झाले तेव्हा उद्घाटन करायला हाच पुढे धावला.याने आणि त्याच्या आमदारांना काय आणले जिल्ह्यात.किंवा ठाकरेंनी काय दिले येथील जनतेला. मी मंत्री असताना नोकऱ्या दिल्या,रस्ते,वीज,पाणी असे प्रश्न सोडविले. डॉक्टर,इंजिनियर होतील अशी कॉलेज आणली.तुम्ही काय आणले.
घाणेरडे बोलता कौतुक करता येत नसेल तर निदान बौद्धिक तरी बोला.नुसती घाणेरडी टीका करू नका.
दोडामार्ग मध्ये ५०० कारखाने आणायचे आहेत. त्यासाठी ओरोस मध्ये ट्रेनिंग सेंटर उभे राहत आहे. सर्व प्रकारचे उद्योग प्रशिक्षण तेथे मिळणार आहे. मात्र त्याचे कौतुक कोणाला वाटत नाही. येथील जनता नोकऱ्यावर न राहता लाखो रुपये मिळतील असे उद्योग उभारावेत अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी काम करत आहे. या उबाठा सेनेचे नेते काय करू शकले ते सांगा. मी नवउद्योजक उभे करतो.आणि उबाठा खासदार,आमदार रस्त्यांचे ठेके घेतात.मी एका वेळेला २८ ब्रीज आणले. धरणे बांधली.६०० डॉक्टर, इंजिनिअर तयार होत आहेत अशी कॉलेज उभी केली.माझ्या विरोधकांनी काय केले याचे उत्तर द्या.
यांनी सी वल्ड ला विरोध केला.सिंगापूर,मलेशिया,अहमदाबाद,गुजरात, ला जावून पहा.सी वर्ल्ड ला विरोध करून जनतेचे नुकसान केले.तुम्ही कोणाला निवडून देणार विकासाला विरोध करणाऱ्या या लोकांना कायमचे घरी बसविण्याची वेळ आली आहे.
यापुढे काही झाले तरी भाजप चाचं खासदार निवडून आणायचा आणि काही झाले तरी या उबाठा खासदार ला पुन्हा संधी द्यायची नाही.घरी बसविल्या शिवाय शांत थांबायचे नाही.
तुम्ही माझे सहकारी आहात.मी साहेब नाही. तुमच्यातील एक कार्यकर्ता आहे. भाजप चे विचार प्रत्येक माणसापर्यंत घेवून जा. ८० कोटी लोकांना मोदी सरकारने मोफत धान्य दिले.शेतकी जनतेचा आर्थिक लाभ देवून सन्मान केला,कोरोनात मोफत लस दिली मात्र ठाकरे बाप बेटा नी कोरीना काळात भ्रष्टाचार केला. आता ते प्रकरण चौकशी मध्ये आले आहे.असेही केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!