श्री.विजय तेली यांच्या प्रामाणिक सुरक्षेचा सेवानिवृत्तीपर सन्मान… श्री.चंद्रशेखर उपरकर यांचे गौरवपूर्ण प्रतिपादन

श्री.विजय तेली यांच्या प्रामाणिक सुरक्षेचा सेवानिवृत्तीपर सन्मान… श्री.चंद्रशेखर उपरकर यांचे गौरवपूर्ण प्रतिपादन

*कोंकण Express*

*श्री.विजय तेली यांच्या प्रामाणिक सुरक्षेचा सेवानिवृत्तीपर सन्मान…
श्री.चंद्रशेखर उपरकर यांचे गौरवपूर्ण प्रतिपादन…..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नजिक वागदे येथील शासकीय दूध योजनेत सुमारे 37 वर्षे पहारेकरी म्हणून प्रामाणिकपणे रात्रं दिवस सुरक्षेचे काम इमानेइतबारे पार पाडणे हा सर्वात मोठा सन्मान असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे व कोकण दुग्ध कर्मचारी संघटनेचे माजी सरचिटणीस श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी
शासकीय दूध योजना,कणकवली येथील श्री.विजय सहदेव तेली यांच्या सेवा निवृत्तीपर सत्कार प्रसंगी बोलताना काढले.
श्री.विजय तेली यांनी
37वर्षे प्रामाणिकपणे शासकीय सेवा करून वयाच्या 60 व्या वर्षी नियतवयोमानानुसार
सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा दुग्धशाळा व्यवस्थापक श्री.कृष्णा चव्हाण यांच्या हस्ते येथील दुग्धशाळेत यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच त्यांच्या पत्नी सौ विद्या तेली यांनाही साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी दुग्धशाळा व्यवस्थापक श्री.कृष्णा चव्हाण,वरिष्ठ लिपिक श्री.विनीत घाणेकर,श्री.संजय सावंत, दुग्ध कर्मचारी संघटनेचे माजी सरचिटणीस श्री.चंद्रशेखर उपरकर,
,श्री.भाई सादये ,श्री.गणपत तेली,पर्यवेक्षक श्री.शेखर गावडे,शशिकांत तेली,राजन रेवंडकर,जिल्हा दुग्ध विकास कार्यालयीन कर्मचारी श्री.बाळकृष्ण येडवे,व श्री.गुरूदास जाधव,वागदे गावचे नागरिक श्री.महेश काणेकर,प्रकाश काणेकर व इतर मंडळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्री.चंद्रशेखर उपरकर म्हणाले की,सन 1968 मध्ये दीड लिटर पासून सुरू झालेल्या सुमारे साडेआठ एकर जागेत उभारलेल्या या सरकारी दुग्धशाळेचे कामकाज तीन शिप्टमध्ये 24 तास चालत असे.आणि 74 कर्मचारी येथे कामकाज करीत होते.योजनेच्या गाड्यांची वर्दळ,5 टनी बर्फ कारखाना ,दररोज 5 ते 7 हजार लिटर दूध संकलन आणि सुमारे 5 हजार लिटर दूध दररोज वितरण करणे हि आरे ब्रँडची शान होती.
अशा या कारखान्याचां आणि या जागेचा शेवटचा पहारेकरी म्हणून श्री.विजय तेली सेवानिवृत्त झाले आहेत.त्यामुळे येथे एकेकाळी असलेली सुबत्ता आणि आता आलेली अवकळा कुणालाही पहावणारी नाही.म्हणूनच श्री.तेली यांनी पार पाडलेले सुरक्षेचे काम अभिमानास्पद व गौरवपूर्ण असल्याचे विचार श्री.उपरकर यांनी व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!