*कोंकण Express*
*केंद्रीय उद्योग मंत्री भाजप नेते नारायण राणे आज २ एप्रिल पासून रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्रीय उद्योग मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते श्री नारायण राणे आज २ एप्रिल पासून रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जनतेच्या व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. संघटनात्मक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. आज दिवसभरातील नियोजित कार्यक्रम आटपून सायंकाळी सात वाजता ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर ते नियोजनानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.