*कोंकण Express*
*अश्मयुगीन गुहेत भरली विद्यामंदिरची शाळा*
*कासार्डे प्रतिनिधि ; संजय भोसले*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना प्राचिन गुहा आणि निसर्गातील दुर्मिळ वनस्पतींचे ज्ञान मिळण्यासाठी एक दिवसांची निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले प्रशालेतील साठ विद्यार्थी आणि निसर्ग भ्रमंतीची आवड असणारे शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले . सुप्रसिद्ध वनस्पती शास्त्राचे अभ्यासक डॉ विजय पैठणे सर वैभववाडी महाविद्यालय यांनी कोळेशी येथिल अश्मयुगीन काळातील गुहा विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली . कोळेशी परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पतींचा खजिनाच आहे नव्या पिढीला या वनस्पतीच्या उत्पती विषयी आणि शास्त्रीय पद्धतींचा उपयोग या विषयी प्रा डॉ पैठणे सरांनी आपल्या संशोधनातून सखोल माहिती देवून विद्यार्थी व शिक्षक यांना आश्चर्यकारक अशी माहितींचा खजिनाच उलगडून दिला . काळाच्या ओघात आज अनेक वनस्पती लृप्त होत आहेत तरीही काही वनस्पती निसर्गात कोठे कोठे दुर्मिळ स्वरूपात मिळत आहेत पण त्यांची ओळख नव्या पिढीला नसते प्रा डॉ पैठणे सरांनी कोळोशी परिसरातील शंभर ते दिडशे वनस्पतींची ओळख विद्यामंदिरच्या विद्यार्थी व अध्यापकांना करून दिली . अश्मयुगीन गुहा हा आश्चर्यकारक प्रसंग आजच्या पिढीला नविन प्रकार आहे या प्रसंगी विज्ञान शिक्षक श्री पृथ्वीराज बर्डे सर श्री योगेश मोर्ये सर इतिहास अभ्यासक श्री अमोल शेळके सर यांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना दुर्मिळ खजिनाच उलगडून दाखविला .
या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्ग आणि गुहा या विषयी ज्ञानप्राप्त झाले व्यवहारी जगात या संकल्पनेतून बौद्धिक क्षमता निश्चितच प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे .