कासार्डे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली

कासार्डे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली

*कोंकण Express*

*कासार्डे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे राजा शिवछत्रपती ग्रुप व नवतरुण उत्कर्ष मंडळ, कासार्डेच्या वतीने शिवजयंती (तिथीनुसार) निमित्त आयोजित करण्यात आलेले भरगच्च कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडले. यावेळी घेण्यात आलेल्या जि.प.शाळा समुह नृत्य स्पर्धेत जि.प. शाळा पोंभूर्ले देऊळवाडी व खुला गट समुह नृत्य स्पर्धेत चिमणी पाखरं कुडाळ ग्रुपने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळयास संजय देसाई व निशा नकाशे याच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी गणेश पाताडे,उद्योजक संतोष पारकर, उद्योजक प्रणिल शेटये,उद्योजक अमोल केवटे, उद्योजक अतुल सावंत, उद्योजक शांतीनाथ (बाबीदादा) लडगे, अध्यक्ष सहदेव उर्फ आण्णा खाडये, ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते, पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर, संजय पाताडे, जीजी पाताडे,प्रविण खांडेकर, संतोष तळेकर, संदिप केसरकर, राजकुमार पाताडे,रविंद्र पाताडे,प्रकाश तिर्लोटकर, जीजी पाताडे, श्वेता चव्हाण, प्रणय जोशी, विजय राणे, अभिजीत धुमाळ, केंद्र मुख्याध्यापक दिपक पवार, गोसावी, सावळे,जाकीर शेख,भाई पाटील, संतोष राणे,विठोबा सावंत, परिक्षक सुहास वरूणकर,राहूल कदम याच्यासह शिक्षक, मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत जि.प. शाळा समूहनृत्य स्पर्धेत व्दितीय क्रमांक जि.प.आदर्श शाळा तळेरे नं. १, तृतीय क्रमांक जि.प.शाळा फोंडा गांगोवाडी व उत्तेजणार्थ जि.प.शाळा शाळा पाटगाव यानी पटकाविला तर केंद्रशाळा कासार्डे नं.१ ,स्वीटलँड इंग्लिश मिडीयम स्कूल, तळेरे, जि.प.शाळा पोंभूर्ले नं. १ यानी सहभाग दर्शविला .तसेच खुल्या गटात व्दितीय क्रमांक एस.के.डान्स अकॅडमी कणकवली,तृतीय क्रमांक न्यु इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले व उत्तेजणार्थ शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण यानी प्राप्त केला. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालय, वैभववाडी,फार्मसी व कृषी महाविद्यालय सांगुळवाडी,जिजाऊच्या लेकी आदी संघानी सहभाग घेतला होता. विजेत्या व सहभागी संघाना मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमोल जमदाडे यानी करत कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजा शिवछत्रपती ग्रुप व नवतरुण उत्कर्ष मंडळाच्या सर्वच सभासदांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!